विठ्ठलवाडी स्टॅण्डच्या रिक्षाचालकांची दिवाळी गोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विठ्ठलवाडी स्टॅण्डच्या रिक्षाचालकांची दिवाळी गोड
विठ्ठलवाडी स्टॅण्डच्या रिक्षाचालकांची दिवाळी गोड

विठ्ठलवाडी स्टॅण्डच्या रिक्षाचालकांची दिवाळी गोड

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. २४ (वार्ताहर) : उल्हासनगरातील विठ्ठलवाडी रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेला असणाऱ्या रिक्षा स्टॅण्डवरील ६२ रिक्षाचालकांना भेटवस्तू, मिठाई आणि प्रत्येकी एक हजार रुपये रोख देऊन त्यांची दिवाळी गोड करण्यात आली.
विठ्ठलवाडी स्थानकाच्या पश्चिमेला कैलासवासी रमाकांत चव्हाण रिक्षा चालक-मालक संघटना आहे. १० वर्षांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या पुढाकाराने स्टॅण्डवरील ६२ रिक्षाचालकांना दिवाळी भेट देण्याचा उपक्रम राबवण्यास सुरुवात झाली. चौधरी यांच्या वतीने मिठाई आणि भेटवस्तू, तर युनियनच्या वतीने ६२ रिक्षाचालकांना प्रत्येकी एक हजार रुपये देऊन त्यांची दिवाळी गोड करण्यात येते. यावेळी दिवाळीची भेटवस्तू देताना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, व्यापारी जयराम खत्री, दिलीप राजवानी, उपविभाग प्रमुख दीपक साळवे आदी उपस्थित होते.