विझती ज्योत पेटविणारा - श्रीरंग सिद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विझती ज्योत पेटविणारा - श्रीरंग सिद
विझती ज्योत पेटविणारा - श्रीरंग सिद

विझती ज्योत पेटविणारा - श्रीरंग सिद

sakal_logo
By

प्रकाशपर्व ः श्रीरंग सिद

नैराश्यग्रस्तांचा मानसिक आधार

इंट्रो
मानसिक आजार, हळूहळू जीवलगांशी तुटत जाणारा संवाद आणि त्यानंतर आलेल्या नैराश्यातून अनेक जण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. आत्महत्या म्हटले तर पूर्णपणे मानसिक आजार; पण त्यावरही उपचार आहेत. अशा नैराश्यग्रस्तांचे समुपदेशन करून त्यांना जीवनाच्या मूळ प्रवाहात आणून जगण्याची नवी आशा दाखवण्याचे काम १७ ते १८ वर्षांपासून श्रीरंग सिद करत आहेत. त्यांच्या कार्यामुळे ‘आयुष्यातील विझणारी ज्योत पेटवणारा’ अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

राहुल क्षीरसागर
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात समाजसेवा अधीक्षक (मनोविकृती) म्हणून कार्यरत असलेले श्रीरंग सिद मूळचे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील भांब गावातील. त्यांनी आपले शालेय शिक्षण भांब येथील शाळेत घेतले. त्यानंतर यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स आणि मास्टर डिग्री इन सोशल वर्क स्पेशलायझेशन मेडिकल ॲण्ड फिनिॲट्रिक सोशल वर्कचे शिक्षण घेतले. त्यानंतर सध्या ते समाजसेवा अधीक्षक म्हणून कार्यरत असून अनेक नैराश्यग्रस्त रुग्णांचे समुपदेशन करत आहेत.
सध्याच्या घडीला बदलती जीवनशैली आणि स्पर्धात्मक युगाच्या गर्तेत माणूस अडकत चालला आहे. घर, प्रवास, कार्यालयीन काम, वातावरण, कुटुंब कलह, प्रेमभंग, वाद-विवाद इत्यादी अनेक गोष्टींमुळे तो सतत मानसिक तणावाखाली वावरत असतो. त्यातून आलेले नैराश्य घातक ठरते. नकळत आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला जातो. अशा मानसिक रुग्णांवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार केले जातात. उपचारांदरम्यान नैराश्यातून आत्महत्येकडे वळताना होणाऱ्या रासायनिक व मानसिक बदलांचा अभ्यास करून रुग्णाचे एकाच वेळी समुपदेशन करून आणि औषध देऊन त्यांना अशा विचारांपासून परावृत्त करता येते, असे सिद सांगतात. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे समुपदेशन करून त्यांच्या जीवनातील नैराश्य दूर करण्याचे काम श्रीरंग सिद १७ ते १८ वर्षांपासून करत आहेत. आजपर्यंत त्यांनी शेकडो रुग्णांचे मनपरिवर्तन करून त्यांना आशेचा किरण दाखवला आहे.
माणसाच्या मेंदूत होणारे रासायनिक बदल, सामाजिक उपक्रमात मनमोकळेपणाने वावर नसणे, संवादाचा अभाव इत्यादी कारणांमुळे माणसे आपल्या मनातील दुःख कोणाला बोलू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यात नकळत ताणतणाव निर्माण होतो. अशाच नैराश्यातून आत्महत्या करण्याचे विचार डोक्यात येतात, असे श्रीरंग सिद यांनी सांगितले.

विझणारी ज्योत पेटवली
दोन वर्षांपूर्वी कोरोना संसर्गाने सर्वत्र मोठ्या प्रमाणात थैमान घातले होते. अनेकांचे रोजगार तेव्हा बुडाले. काहींना नोकरी गमवावी लागली. अशा वेळी आलेल्या नैराश्यातून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले होते. तेव्हा श्रीरंग सिद यांनी अनेकांना मानसिक आधार दिला. अशा रुग्णांच्या औषधोपचारासह समुपदेशनाच्या जोडीने सिद यांनी अनेकांच्या आयुष्याची विझणारी ज्योत पेटवण्याचे काम केले.