आदित्य ठाकरे यांची ठाण्यातील ‘दिवाळी’कडे पाठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदित्य ठाकरे यांची ठाण्यातील ‘दिवाळी’कडे पाठ
आदित्य ठाकरे यांची ठाण्यातील ‘दिवाळी’कडे पाठ

आदित्य ठाकरे यांची ठाण्यातील ‘दिवाळी’कडे पाठ

sakal_logo
By

ठाणे, ता. २४ : शहरात आज नरक चतुर्दशीच्या निमित्ताने ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले; मात्र आदित्य ठाकरे कबूल करूनही ठाण्यात का आले नाहीत, याची खमंग चर्चा ठाणे शहरात सुरू आहे. कदाचित मुख्यमंत्र्यांना मिळाला तेवढा प्रतिसाद आपल्याला ठाण्यात आल्यावर मिळण्याची खात्री वाटत नसल्यानेच त्यांनी आज ठाण्यात येणे टाळले असावे, अशी भीती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली आहे.
सोमवारी दिवाळीच्या पहिल्या दिवशी ठाण्यात जागोजागी मोठ्या उत्साहात आणि आनंदात दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ठाण्यातील तरुणाई मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहते. तलावपाळी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. या वेळी त्यांना तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळाला. पत्रकारांशी संवाद साधताना म्हस्के म्हणाले, की शिंदे यांना कसा प्रतिसाद मिळतो याचा सेनाभवनात बसलेल्या व्यक्तींनी आढावा घेतला असेल. त्या वेळी त्यांना शिंदे यांना ठाण्यात जागोजागी अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असल्याची माहिती मिळाली असेल. एवढा प्रतिसाद आपल्याला मिळणे शक्य वाटत नसल्यानेच त्यांनी ठाण्यात येणे टाळले असावे. दरम्यान, जे लोक स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात पण हिंदुत्वाला विरोध करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात त्यांच्यासोबत सर्वसामान्य जनता नाही, हे आजच्या या प्रसंगामुळे स्पष्ट झाले असल्याचे मत म्हस्के यांनी या वेळी स्पष्ट केले.