दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू
दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू

दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू

sakal_logo
By

मनोर, ता. २४ ः चिल्हार-बोईसर रस्त्यावर मान गावच्या हद्दीत रविवारी रात्री भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. जगदीश धोडी (वय ४१) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव असून ते बोईसर ग्रामपंचायतीचे कर्मचारी होते. दिवाळीच्या पूर्वसंध्येला झालेल्या अपघातामुळे बोईसर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बोईसर ग्रामपंचायतीच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी जगदीश धोडी रविवारी संध्याकाळी पडघे गावातून त्यांचा पुतण्या आणि भाचीला दुचाकीवरून बोईसरच्या दांडी पाड्याच्या दिशेने जात असताना मान गावच्या हद्दीत साईबाबा मंदिराजवळ त्यांच्या दुचाकीला मागून आलेल्या भरधाव ट्रकने धडक दिल्याने अपघात झाला. दुचाकीवरील दोन्ही लहान मुले रस्त्याच्या बाजूला फेकली गेल्याने थोडक्यात वाचली. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून ट्रक घेऊन पसार झाला.