गोडाऊनला भीषण आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोडाऊनला भीषण आग
गोडाऊनला भीषण आग

गोडाऊनला भीषण आग

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. २४ (बातमीदार) ः अंबरनाथच्या बुवापाडा परिसरात प्लास्टिकच्या साहित्याच्या गोदामाला आज भीषण आग लागली. गोदाम मानवी वस्तीत असल्याने एकच गोंधळ उडाला. आग मोठ्या प्रमाणात असल्याने आगीचे लोट हे मानवी वस्तीत येत होते. परवानगी न घेता अनधिकृतपणे ते उभारण्यात आल्याचे कळते. आगीचे वृत्त समजताच अंबरनाथ अग्निशमन दलाच्या तीन बंबांकडून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. आगीचे कारण उशिरापर्यंत समजू शकले नाही.