वडपे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अनंता पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडपे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अनंता पाटील
वडपे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अनंता पाटील

वडपे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अनंता पाटील

sakal_logo
By

वडपे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अनंता पाटील
पडघा, ता. २५ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडपे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अनंता पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
मावळत्या सरपंच शशिकला पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे सरपंचपद रिक्त होते. त्यानुसार निवडणूक अध्यासी अधिकारी रेखा पाते यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात सभा घेण्यात आली. या वेळी अनंता पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंचपदावर बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. या वेळी मावळत्या सरपंच शशिकला पाटील, उपसरपंच रूपेश शेलार, सदस्य प्रतीक्षा गायकवाड, कविता सोंगाळ, प्रेमनाथ वडोलकर उपस्थित होते. सचिव म्हणीन ग्रामसेवक भालचंद्र पवार यांनी काम पाहिले.