ठाणे जिल्हा ट्रेकर्स संघटनेतर्फे गोरखगडावर दीपोत्सव साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे जिल्हा ट्रेकर्स संघटनेतर्फे गोरखगडावर दीपोत्सव साजरा
ठाणे जिल्हा ट्रेकर्स संघटनेतर्फे गोरखगडावर दीपोत्सव साजरा

ठाणे जिल्हा ट्रेकर्स संघटनेतर्फे गोरखगडावर दीपोत्सव साजरा

sakal_logo
By

मुरबाड, ता. २५ (बातमीदार) : दुर्गप्रेमींचे आवडते ठिकाण असणाऱ्या मुरबाड तालुक्यातील गोरखगड येथे लक्ष्मीपूजनानिमित्त ठाणे जिल्हा ट्रेकर्स असोसिएशनच्या वतीने दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री मोहीम सुरू करण्यापूर्वी पायथ्याशी वसलेल्या गोरक्षनाथ मंदिरामध्ये आरती करण्यात आली व चढाईला सुरुवात करण्यात आली. जिकिरीची चढाई केल्यानंतर पहाटे चार वाजता माथ्यावरील मंदिरावर जाण्यासाठीची अवघड मोहीम सुरू केली. तेथे दीपोत्सवाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
दीपोत्सवाच्या माध्यमातून गोरखगडावरील पर्यटनाचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी दर वर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो, असे ठाणे जिल्हा ट्रेकर्स असोसिएशनचे अध्यक्ष चेतनसिंह पवार यांनी सांगितले. दीपोत्सव यशस्वी होण्यासाठी अनिल चिराटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मेहनत घेतली. दीपोत्सवच्या कार्यक्रमामध्ये ॲड. दिनेश सासे, जयवंत हरड आदींसह मुरबाड, शहापूर, कल्याण तालुक्यातील ट्रेकर्स सहभागी झाले होते.