बालकाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालकाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी
बालकाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी

बालकाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी

sakal_logo
By

भिवंडी, ता. २५ (बातमीदार) : भिवंडी शहरातील अजमेरनगर येथे रविवारी गटारात पडून प्रथमेश यादव या दोनवर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाणे येथे अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी मृत्यूस महानगरपालिका प्रशासन, संबंधित ठेकेदार, अभियंता व स्वच्छता विभाग हे सर्व सामूहिकपणे जबाबदार आहेत. निष्काळजीपणा केल्याने बालकाच्या मृत्यूस कारणीभूत असल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी मृत प्रथमेशचे काका संजय यादव यांनी केली आहे.
या ठिकाणी पालिका प्रशासनाने गटार दुरुस्ती करण्यासाठी दोन वर्षांपासून सुरुवात केली. त्यासाठी गटारांवरील स्लॅब फोडून काही इंच उंची वाढवून दुरुस्ती केली; पण त्यावरील स्लॅब अथवा लाद्या टाकून गटार झाकले नसल्याने या ठिकाणी हा अपघात घडला असल्याचा आरोप संजय यादव यांनी केला आहे. येथील चेंबर लाद्या लावण्याबाबत स्वच्छता अॅपवर तक्रार करूनही त्याची दखल पालिका प्रशासनाने घेतली नाही. या गटाराची नियमित स्वच्छता केली असती, तर चिमुकला प्रथमेश जिवंत राहिला असता. नारपोली पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असली तरी या अपघातस्थळाचा पंचनामा करून नक्की त्यास कोण जबाबदार आहे, हे तपासून त्यानुसार त्यामध्ये दोषी आढळून येणाऱ्यांवर नक्कीच कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिस प्रशासनातर्फे देण्यात दिली आहे.