रस्त्यावर तेल सांडल्याने वाहतूक विस्कळीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्यावर तेल सांडल्याने वाहतूक विस्कळीत
रस्त्यावर तेल सांडल्याने वाहतूक विस्कळीत

रस्त्यावर तेल सांडल्याने वाहतूक विस्कळीत

sakal_logo
By

ठाणे, ता. २५ (वार्ताहर) : ठाण्यात महामार्गावरून भरधाव जाणाऱ्या वाहनांमधून ऑईल रस्त्यावर सांडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सोमवारी (ता. २४) दुपारी ठाणे येथील वागळे इस्टेट येथील रस्ता क्र. ३३ वरती ऑईल सांडल्याचा प्रकार घडला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. शिवाय अपघात टाळण्यासाठी काही काळ वाहतूक अन्य मार्गावरून वळवण्यात आली. ऑईल सांडलेल्या जागी माती टाकून पुन्हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.