खारघर पाणीप्रश्नावरून सिडकोला इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारघर पाणीप्रश्नावरून सिडकोला इशारा
खारघर पाणीप्रश्नावरून सिडकोला इशारा

खारघर पाणीप्रश्नावरून सिडकोला इशारा

sakal_logo
By

खारघर, ता. २५ (बातमीदार) : सिडको वसाहतींमधील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी ठराविक मुदतीत ठोस उपाययोजना करा; अन्यथा आंदोलन करू, असा इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (ता. २१) सिडकोच्या बैठकीत दिला.
पनवेल महापालिका हद्दीतील सिडको वसाहतींमध्ये अनेक दिवस कमी पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. सिडको वसाहतींमध्ये सतत पाण्याचा तुटवडा भासत असल्याने त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व सिडको सतत वेगवेगळी करणे देत असते. आता ते थांबवा. तुमच्या अडचणी तुम्ही सोडवा, पण नागरिकांना पुरेसे पाणी द्या. त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करा; अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल, असे ठाकूर यांनी सिडको अधिकाऱ्यांना सांगितले आहे. या वेळी पाडलेल्या पाण्याच्या टाक्यांचे काम लवकरच सुरू होणार असून इतरही कामांच्या टेंडरची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सिडकोचे मुख्य अभियंता राजेंद्र धायकर यांनी दिली. या वेळी अनेक माजी नगरसेवकांनी पुरेसे पाणी नसताना बिल्डरांना ओसीसाठी ना हरकत दाखला देऊ नका अशी मागणी केली.