अवजड वाहनामुळे धाकटी डहाणूखाडी पुलाला धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवजड वाहनामुळे धाकटी डहाणूखाडी पुलाला धोका
अवजड वाहनामुळे धाकटी डहाणूखाडी पुलाला धोका

अवजड वाहनामुळे धाकटी डहाणूखाडी पुलाला धोका

sakal_logo
By

डहाणू ता. २५ (बातमीदार) : डहाणू-चिंचणी सागरी महामार्गाच्या रस्त्यावरून, अदाणी इलेक्ट्रॉनिकल कंपनीतील राखेने भरलेली अवजड वाहने जात असल्याने हा रस्ता दबला जाऊन त्यावर तडे पडले आहेत. या अवजड वाहनामुळे धाकटी डहाणू खाडीपुलाला धोका निर्माण झाला आहे. डहाणू-चिंचणी सागरी महामार्गावरून, अदानी इलेक्ट्रिकल कंपनीतून चाळीस टन क्षमतेचे कोळशाच्या राखेने भरलेली ट्रक गुजरातकडे जात असतात, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत बांधण्यात आलेला रस्ता दबला जाऊन त्याची चाळण झाली आहे, त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. शिवाय अवजड वाहनाच्या अतिभारामुळे धाकटी डहाणू येथील ४०० मीटर लांबीच्या पुलाला धोका निर्माण झाला आहे. या पुलाच्या दक्षिण टोकाला मागच्या वर्षी भगदाड पडले होते; शिवाय येथील भरावही दबू लागला आहे, त्यामुळे पुलाला धोका पोहोचण्याची दाट शक्यता आहे. याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज असून, या रस्त्यावरून दररोज होणाऱ्या अवजड वाहनाच्या दोनशे ते तीनशे फेऱ्यावर बंधन घालण्याची आवश्यकता असल्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तसेच या रस्त्याच्या बांधकामासाठी, अदाणी इलेक्ट्रिसिटी कंपनीने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे निधी देण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.