विशेष मुलांसोबत (अनाथ) साजरी केली दिवाळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विशेष मुलांसोबत (अनाथ) साजरी केली दिवाळी
विशेष मुलांसोबत (अनाथ) साजरी केली दिवाळी

विशेष मुलांसोबत (अनाथ) साजरी केली दिवाळी

sakal_logo
By

मुंबई : अनाथ मुलांच्या आयुष्यात आनंद भरण्यासाठी महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील कलाकार गौरव मोरे यांनी त्यांची दिवाळी त्यांच्यासोबत साजरी केली. मुलांच्या आयुष्यात सुखाचा प्रकाश यावा म्हणून सांताक्रूझ पूर्व येथील जाकू क्लब मधील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर रहिवासी गेली सात वर्षे अनाथ मुलांसोबत आपली दिवाळी साजरी करतात. यंदा हा आनंद व्दिगुणीत व्हावा आणि मुलांना आणखी आनंदाचे क्षण मिळावेत यासाठी गौरव यांच्या सहभागाने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात १८ वर्षांखालील एकूण ३४ मुले-मुली सहभागी झाल्या होत्‍या.