भूषण प्रतिष्ठानतर्फे दिवाळी फराळाचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भूषण प्रतिष्ठानतर्फे दिवाळी फराळाचे वाटप
भूषण प्रतिष्ठानतर्फे दिवाळी फराळाचे वाटप

भूषण प्रतिष्ठानतर्फे दिवाळी फराळाचे वाटप

sakal_logo
By

शिवडी, ता. २५ (बातमीदार) ः आदिवासी पाड्यातदेखील दिवाळी उत्सव उत्साहात साजरा व्हावा, यासाठी भूषण प्रतिष्ठानच्या वतीने मुंबईतील दादरमधील ‘आपला माणूस’ सामाजिक कार्यकर्ते भूषण पवार आणि मित्र मंडळीनी एकत्र येत यंदाची दिवाळी पालघरमधील देवळी या आदिवासी पाड्यातील बांधवांसोबत सोमवारी (ता. २५) साजरी केली. २०० हून अधिक घरांमध्ये दिवाळीचा फराळ, भेटवस्तूंचे वाटप करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच आरोग्य, व्यसनमुक्तीबद्दल मार्गदर्शनदेखील करण्यात आले.