उपसरपंचपदी धीरज गावड यांची बिनविरोध निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपसरपंचपदी धीरज गावड यांची बिनविरोध निवड
उपसरपंचपदी धीरज गावड यांची बिनविरोध निवड

उपसरपंचपदी धीरज गावड यांची बिनविरोध निवड

sakal_logo
By

पालघर, ता. २५ (बातमीदार) : आज झालेल्या नांदगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदाच्या निवडणुकीत मनसेचे सलग तीन वेळा सदस्यपदी निवडून आलेले धीरज गावड यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. पालघर तालुक्यातील नुकताच झालेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यपदाच्या निवडणुकीनंतर आज काही ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुका झाल्या. नांदगाव ग्रामपंचायतमध्ये एकूण नऊ सदस्य आहेत. यापैकी सहा सदस्य मनसेचे निवडून आलेत, तर तीन सदस्य बहुजन विकास आघाडीचे निवडून आलेत. आज झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीसाठी मनसेचे धीरज गावड यांचा एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. या निवडणुकीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून उमाकांत डबेटवार होते. त्यांच्या अधिकारात उपसरपंचपदाची निवडणूक झाली.