पाकिस्तानात अडकलेल्या खलाशांच्या कुटुंबीयांना भेटवस्तू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाकिस्तानात अडकलेल्या खलाशांच्या कुटुंबीयांना भेटवस्तू
पाकिस्तानात अडकलेल्या खलाशांच्या कुटुंबीयांना भेटवस्तू

पाकिस्तानात अडकलेल्या खलाशांच्या कुटुंबीयांना भेटवस्तू

sakal_logo
By

बोर्डी, ता. २४ (बातमीदार) : पोलिस निरीक्षक रवींद्र पारखे यांनी जनसंवाद अभियानांतर्गत घोलवड पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रातील गावांमधून गुजरात राज्यात खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेले खलाशी व तेथून पाकिस्तानमध्ये पोलिसांच्या जाळ्यात अडकलेले खलाशी यांच्या कुटुंबीयांची जाऊन भेट घेतली व दिवाळी सणानिमित्त दिवाळी फराळ-मिठाई वाटून सर्वांना भेटवस्तू वाटप करून दीपावलीच्या शुभेच्या दिल्या. या वेळी त्यांचाशी चर्चा करत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांना धीर दिला. या वेळी काही अडचण भासल्यास अथवा नातेवाईकांची काही माहिती समजल्यास त्वरित पोलिस स्टेशनशी संपर्क करणेबाबत सूचना दिल्या. तसेच या वेळी पारखे यांनी परराज्यात मासेमारीसाठी जाणाऱ्या खलाशांची माहिती लगेच पोलिस स्टेशनला कळवावी, याबाबत सूचना नागरिकांना देण्यात आल्या. या वेळी स्थानिक सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.