ठाण्यात फटाक्यांची जोरदार आतिषबाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात फटाक्यांची जोरदार आतिषबाजी
ठाण्यात फटाक्यांची जोरदार आतिषबाजी

ठाण्यात फटाक्यांची जोरदार आतिषबाजी

sakal_logo
By

ठाणे, ता. २५ (वार्ताहर) : ‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे म्हटले जाते. फराळ, कपडे, रोषणाई, खरेदी, फटाक्यांची आतषबाजी आदींमुळे दिवाळी ही अविस्मरणीय ठरते. यंदा दोन वर्षांनंतर ठाण्यात फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतषबाजी झाली. याच आतषबाजीने ठाणेकरांना आणि बच्चे कंपनीला आनंद मिळाला असला, तरीही माणसाच्या आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम येणाऱ्या काळात दिसण्याची शक्यता आहे.
कोराना निर्बंधाच्या दोन वर्षांनंतर यंदा ठाण्यात फटाक्याची मोठ्या प्रमाणात आतषबाजी झाली. यंदा ठाण्याच्या एकमेव कोपरीतील बाजारपेठेत कर्कश आवाजाच्या फटाक्यांसह यंदा फॅन्सी फटाक्यांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे. या फटाक्याची खरेदी प्रामुख्याने लहान मुलांसाठी होत असल्याने मुलांना आकर्षित करण्यासाठी विविध आकर्षक चित्रांचा आणि सुंदर पॅकिंगचा वापर करण्यात आला आहे. बाजारात यंदा फॅन्सी फटक्यात १२ स्टार, कॅकलिंग, १२० शॉटस, ६० शॉट्स, गुडिया अनार, सायरन आवाज अशा अनेक फटाके पाहायला मिळाले. फटाक्याच्या किमतीत यंदा २० ते ३० टक्क्यांनी वाढ झालेली असल्याचे मत फटाके घाऊक व्यापारी बंडू शेठ यांनी दिली.
फटाक्यातून निघालेल्या धुरामुळे विविध आजार बळावण्याची शक्यता आहे. फटाक्यांच्या धूर वातावरणात पसरल्याने फुप्फुसाचा रोग उद्‌भवण्याची शक्यता आहे. तसेव कॅन्सर, श्वासासह डोळ्यांची समस्या, हाय ब्लडप्रेशर अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

दोन वर्षांनंतर कोपरीत पुन्हा जत्रा
दिवाळीच्या दिवसात किमान तीन दिवस अगोदरपासूनच कोपरी परिसरात घाऊक व्यापारी असलेल्या दुकानातून फटाक्यांच्या खरेदीला सुरुवात होते. दिवाळीत या परिसरात खरेदीसाठी भरणाऱ्या या जत्रेने वाहतुकीची मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते. कोरोनानंतर दोन वर्षांनी यंदाही हे चित्र कायम होते.
.....

फटाक्याच्या अताषबाजीमुळे निघणाऱ्या धुरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. ध्वनी, वायुप्रदूषण होते. याचाच मानवी जीवनावर परिणाम होताना दिसतो. धुरामुळे श्वसनासंबंधी त्रास होतो, तसेच ज्यांना पूर्वीपासून श्वसनाचा त्रास आहे, त्यांच्या समस्या वाढतात. हृदयरोग, तसेच अन्य समस्या जाणवतात. या धुरामुळे दमा असलेल्या लोकांना याचा मोठा त्रास होतो.
- कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे सिव्हिल