चार वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चार वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू
चार वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू

चार वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू

sakal_logo
By

मनोर, ता. २५ (बातमीदार) ः चिल्हार-बोईसर रस्त्यावरील खैरापाडा रेल्वे ब्रिजवर दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने चार वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. दुचाकीस्वाराची पत्नी आणि मुलगी किरकोळ जखमी झाली आहेत.
मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास बुलेटवरून दुचाकीस्वार त्याची पत्नी आणि दोन मुलांना घेऊन चिल्हार बोईसर रस्त्यावरून बोईसरच्या दिशेने जात होते. खैरापाडा रेल्वे उड्डाणपुलाच्या उतारावर बुलेटला मागून आलेल्या स्टील वायर भरलेल्या ट्रकने धडक दिल्याने बुलेटवरील चार वर्षांचा मुलगा ट्रकच्या चाकाखाली आल्याने ठार झाला, तर दुचाकीस्वार, पत्नी आणि लहान मुलगी रस्त्याच्या कडेला पडल्याने किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
...
उपाययोजना करण्याची मागणी
बोईसर चिल्हार रस्त्यावरील धोकादायक पद्धतीने सुरू असलेल्या अवजड वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दोन दिवसांपूर्वीच मान गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात बोईसर ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. मुंबई अहमदाबाद महामार्ग आणि तारापूर औद्योगिक वसाहतीला जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. येथे अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. या रस्त्यावर दररोज अपघात होत आहेत. ते रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.