यारी दोस्ती ग्रुपकडून आगळी वेगळी दिवाळी साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यारी दोस्ती ग्रुपकडून आगळी वेगळी दिवाळी साजरी
यारी दोस्ती ग्रुपकडून आगळी वेगळी दिवाळी साजरी

यारी दोस्ती ग्रुपकडून आगळी वेगळी दिवाळी साजरी

sakal_logo
By

कासा, ता. २५ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील वेती या गावात यारी-दोस्ती फाऊंडेशनमार्फत दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम राबवून पालघर जिल्ह्यात गरजू आजी-आजोबांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. यारी-दोस्ती ग्रुपमधील सर्व सदस्यांनी निःस्वार्थ भावनेने निधी गोळा करून यंदाची दिवाळी ही आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी केली. या ग्रुपमार्फत गावातील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा राबवण्यात आली, तसेच विद्यार्थ्यांकडून आकाश कंदील बनवून घेऊन ज्यांनी उत्कृष्ट पद्धतीने बनवले होते, त्यांना बक्षीस देण्यात आले. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित विक्रमगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप गीते, कासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील आणि विकास समाचारचे संपादक आरिफ पटेल, मयूरी वर्मा उपस्थित होत्या.