सवादे येथे दीपावली निमित्त फराळ वाटपाचा कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सवादे येथे दीपावली निमित्त फराळ वाटपाचा कार्यक्रम
सवादे येथे दीपावली निमित्त फराळ वाटपाचा कार्यक्रम

सवादे येथे दीपावली निमित्त फराळ वाटपाचा कार्यक्रम

sakal_logo
By

विक्रमगड, ता. २५ (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यातील सवादे वांगड वाडा येथे विक्रमगड पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक प्रदीप गीते यांच्याकडून पाड्यातील सर्वांना फराळाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात कविता गीते, विक्रमगड पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक सतीश जगताप, सुनंदा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक दिनेश गुडेकर, सवादे पोलिस पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते पाड्यातील उपस्थित नागरिकांना फराळ व मिठाईचे वाटप करण्यात आले. गेल्या वर्षीही हा उपक्रम विक्रमगड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रदीप गीते यांच्याकडून राबवण्यात आला होता. लहान मुलांना बिस्किटांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास पाड्यातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.