ध्वनिप्रदुषणानेही ओलांडली मर्यादा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ध्वनिप्रदुषणानेही 
ओलांडली मर्यादा
ध्वनिप्रदुषणानेही ओलांडली मर्यादा

ध्वनिप्रदुषणानेही ओलांडली मर्यादा

sakal_logo
By

मुंबई, ता. २५ : दिवाळीनिमित्त मुंबईत वायुप्रदूषणाबरोबरच ध्वनिप्रदूषणातही मोठी वाढ झाल्याची नोंद करण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी करताना मुंबईत मर्यादेपेक्षा अधिक आवाजाची नोंद झाल्याचे आवाज फाऊंडेशनच्या निदर्शनास आले. यंदा शिवाजी पार्क आणि मरीन ड्राईव्ह येथे मर्यादेपेक्षा अधिक आवाज होता.
आवाज फाऊंडेशनने शिवाजी पार्कच्या मैदानात रात्री ९.४५ वाजता १०३.४ डेसिबल आवाजाची नोंद केली; तर मरीन ड्राईव्हवर रात्री १०.३० ते ११.४५ दरम्यान १०९.१ डेसिबल आवाज नोंदवण्यात आला. या परिसरात पोलिस बंदोबस्त असतानाही आवाजाची मर्यादा ओलांडण्यात आली होती. शिवाजी पार्क परिसरात रात्री १२ वाजताही फटाक्यांचा आवाज १०७ डेसिबलपर्यंत पोहोचल्याचे आवाज फाऊंडेशनच्या पाहणीत आढळून आले. दिवाळी प्रदूषणमुक्त, ध्वनिप्रदूषणमुक्त साजरी व्हावी यासाठी अनेकदा जनजागृती केली जाते; पण या वर्षी ध्वनिप्रदूषणात वाढ झाल्याचे आवाज फाऊंडेशनच्या सुमैरा अब्दुलाली यांनी सांगितले.