दिवाळीची पहाट अभ्यंग स्नानासह लक्ष्मी पुजन जल्लोषात साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळीची पहाट अभ्यंग स्नानासह लक्ष्मी पुजन जल्लोषात साजरा
दिवाळीची पहाट अभ्यंग स्नानासह लक्ष्मी पुजन जल्लोषात साजरा

दिवाळीची पहाट अभ्यंग स्नानासह लक्ष्मी पुजन जल्लोषात साजरा

sakal_logo
By

विक्रमगड, ता. २५ (बातमीदार) : विक्रमगड शहरासह ग्रामीण भागात मोठया उत्साहाने दिवाळीला सुरुवात झाली असुन दिवाळीची पहाट अभ्यंग स्नानासह लक्ष्मीपुजन जल्लोषात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विक्रमगड व परिसर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन गेला आहे. लक्ष्मी पुजनाच्या दिवशी पहाटेपासुनच तालुक्यातील नागरिकांनी रस्त्यास्त्यांवर फटाक्यांची आतशबाजी सुरू केली.
लक्ष्मीपुजनाच्या दिवशी बाजार पेठेतील दुकानांमध्ये नविन हिशोबाच्या चोपडया, वार्षिक कॅलेंडर, आणि लक्ष्मी देवीच्या फोटो खरेदी करण्यासाठी नागरिकांची सकाळीच मोठी गर्दी केली होती. या वेळी व्यापारीवर्गाने आपल्या नविन व जुन्या हिशोबांच्या चोपडया, दुकानातील यंत्राची लक्ष्मी पुजनाच्या मुहर्तावर पुजन केले. तर दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजन व अभ्यनगं स्नान असल्याने या दिवशी घराघरात गोडधोड नैवद्य करण्यात आला. एकदरीत तालुक्यात दिवाळी सण उत्साहात साजरा करण्यात आला.