पडघ्यात दिवाळी पहाटला रसिकांची दाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पडघ्यात दिवाळी पहाटला रसिकांची दाद
पडघ्यात दिवाळी पहाटला रसिकांची दाद

पडघ्यात दिवाळी पहाटला रसिकांची दाद

sakal_logo
By

पडघा, दि. २५ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील पडघा येथे आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पडघा ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य उद्योजक शैलेश बिडवी यांच्या संयुक्त विद्यमाने पडघा बाजारपेठ येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सकाळच्या शांत वातावरणात गायत्री जाधव, आदीती पाटील, सतीष पोखरकर यांनी आपल्या सुमधूर आवाजात भावगीते, भक्तीगीते, दिवाळीगीते सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. यावेळी त्यांना हार्मोनियम वादक दिलीप बजागे, तबला वादक चेतन तरे वासरी वादक जयेश कराळे, ऑर्गन समेश मगर, निवेदक सिद्धार्थ वारघडे यांची साथ मिळाली.
यावेळी सरपंच अमोल बिडवी, उपसरपंच अभिषेक नागावेकर, ग्रामपंचायत सदस्य सायली पाटील, मयुरेश गंधे, ग्रामविकास अधिकारी आर. आर. बन, डॉ. संजय पाटील, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष दिनेश गंधे, रविंद्र कराडकर, अशोक शेरेकर, योगेश तांबोळी उपस्थित होते.
पडघा : येथे दिवाळी पहाट कार्यक्रमात गाणी सादर करताना गायक कलाकार