दिवाळीचा मुहूर्त साधत दुचाकी खरेदी जोरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळीचा मुहूर्त साधत दुचाकी खरेदी जोरात
दिवाळीचा मुहूर्त साधत दुचाकी खरेदी जोरात

दिवाळीचा मुहूर्त साधत दुचाकी खरेदी जोरात

sakal_logo
By

कासा, ता.२५ (बातमीदार) : दिवाळीचा शुभ मुहूर्त साधत डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागात दुचाकी खरेदी करण्यासाठी नागरिकांनी दुकानात मोठी गर्दी केली. कासा बाजारपेठेत दुचाकी विक्रीची चार ते पाच दुकाने आहेत. ग्रामीण भागातील वीस ते पंचवीस खेडे गावातील नागरीक कासा बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. त्यात सद्या बडोदरा महामार्ग, बुलेटट्रेन मार्ग, सागरी महामार्ग, वाढवन बंदरचे काम सुरू असल्याने अनेक शेतकऱ्याच्या जमिनी त्या प्रकल्पात गेल्याने मोठ्या प्रमाणात जमिनीचे मोबदला मिळाला आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकीबरोबरचं इलेक्ट्रिक वस्तू खरेदी करण्याकरिता नागरीक वळले आहेत. त्यामुळे दुचाकी विक्रीचा व्यवसाय तेजीत आहेत. त्यात अनेक दुकादारांकडून कर्ज देऊन वाहन मिळत असल्याने वाहन खरेदी जोरात आहे.