साकीनाका येथे गोदामाला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साकीनाका येथे गोदामाला आग
साकीनाका येथे गोदामाला आग

साकीनाका येथे गोदामाला आग

sakal_logo
By

घाटकोपर, ता. २५ (बातमीदार) ः साकीनाका भागातील खैरानी रोड जंगलमंगल परिसरातील एका प्लास्टिकच्या गोदामाला आज (ता. २५) पहाटेच्या सुमारास आग लागली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही; मात्र काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून, याप्रकरणी पोलिस चौकशी केली जात आहे.
या आगीच्या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दरम्यान, या गोडाऊनमधील प्लास्टिकचे साहित्य जळून खाक झाल्यामुळे मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली याची चौकशी सुरू आहे, अशी माहिती साकीनाका पोलिसांनी दिली आहे.