चिमुकल्यांनी साकारला किल्ले ‘सुवर्णदुर्ग’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिमुकल्यांनी साकारला किल्ले ‘सुवर्णदुर्ग’
चिमुकल्यांनी साकारला किल्ले ‘सुवर्णदुर्ग’

चिमुकल्यांनी साकारला किल्ले ‘सुवर्णदुर्ग’

sakal_logo
By

भांडुप, ता. २५ (बातमीदार) ः रांगोळी, कंदील, फटाके या गोष्टींप्रमाणे दिवाळीचे वैशिष्ट्य म्हणजे गड-किल्ले. दिवाळी म्हटले की मातीचा किल्ला बनवण्यासाठी लहानग्यांची धडपड सुरू होते. सध्याच्या ‘स्मार्टफोन’ युगातही ही परंपरा कायम असल्याचे यंदाही दिसून येत आहे. दरवर्षीप्रमाणे भांडुप पश्चिम जरी मरी आई मंदिर परिसरात अचानक मित्र मंडळमधील लोकवस्तीत ‘सुवर्णदुर्ग’ किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.
भांडुपसारख्या मोठ्या शहरात झपाट्याने वाढलेल्या शहरीकरणात माती, दगड आणि जागा मिळणे कठीण झाल्याने सध्या सिमेंटच्या जंगलात दिवाळीतील हे दृश्य इतिहासजमा होत चालले आहे. दिवाळीची सुट्टी सुरू होताच दगड, माती, मावळे, शिवाजी यांची जमवाजमव करणारे लहानगे दिसेनासे झाले आहेत. मातीचे किल्ले हळूहळू विस्मृतीत जाताना दिसतायत. अशा परिस्थितीतदेखील भांडुप येथील काही चिमुकल्यांनी सुवर्णदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती साकारल्याने परिसरात कौतुक होत आहे.