करंजाडेमधील पाणीसमस्येसाठी प्रयत्नशील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करंजाडेमधील पाणीसमस्येसाठी प्रयत्नशील
करंजाडेमधील पाणीसमस्येसाठी प्रयत्नशील

करंजाडेमधील पाणीसमस्येसाठी प्रयत्नशील

sakal_logo
By

पनवेल, ता. २७ (बातमीदार) : करंजाडेमधील जलवाहिनीचे काम २०२३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, ते काम अद्याप रखडले असल्याने आता करंजाडेमधील नागरिकांची पाण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (ता. २४) करंजाडेमध्ये झालेल्या पक्षप्रवेशावेळी केले.
भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत सोमवारी शेकापचे माजी सरपंच बळीराम म्हात्रे आणि माजी उपसरपंच आशा म्हात्रे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे शेकापला करंजाडेमध्ये मोठा धक्का बसला आहे. या वेळी त्यांच्यासोबत सुनील भोईर, प्रभुद सामाजिक संस्थेचे विक्रम मोरे, अविनाश कदम, गणेश गायकर, विशाल म्हात्रे, छोटुराम पारधी, उपाबाई पारधी, गायत्री पारधी, रवींद्र पारधी, नितीन पारधी, अभिजित थोरात, किशोर यादव, अमोल माने, सुजित जाधव, सदानंद सराफ, रूपेश पेडांमकर, अनेक शेकाप कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेश कार्यक्रमाला भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुण भगत, कर्णा शेलार, विनोद साबळे, मिरेंद्र शहारे, नाथाभाई भारवाड, सागर आंग्रे, मंगेश शेलार, विजय आंग्रे, गणेश मोरे, नंदू भोईर यांच्यासह श्री सामाजिक संस्थेचे सदस्य, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या वेळी बळीराम म्हात्रे यांची भाजपचे तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले.