बोगस कॉलसेंटर सर्व्हर उद्‍ध्वस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोगस कॉलसेंटर सर्व्हर उद्‍ध्वस्त
बोगस कॉलसेंटर सर्व्हर उद्‍ध्वस्त

बोगस कॉलसेंटर सर्व्हर उद्‍ध्वस्त

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २५ (वार्ताहर) : बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून परदेशातील कॉल्स बेकायदा भारतीय मोबाईल क्रमांकावर वळवून सरकारची फसवणूक करणाऱ्या चौकडीला नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तांत्रिक तपास करून अटक केली आहे. या टोळीने सुरू केलेल्या बोगस कॉल सेंटर सर्व्हरमुळे भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनची सुमारे दोन कोटी ६२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे आढळून आले आहे. अशा बोगस कॉल सेंटर सर्व्हर प्रणालीचा उपयोग दहशतवादी कारवाया करण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे या टोळीने केलेल्या सर्व गैरकृत्यांचा तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी दिली.
या कारवाईत अटक करण्यात आलेल्यांमध्ये सूरज मुरली वर्मा (वय ३०), अनुप मुरली वर्मा (वय ४०), साजिद जलिल सय्यद (वय ३६) व अब्दुल अजिज फिरोजाबादी (वय ४२) या चौघांचा समावेश असून या चौकडीने कलेक्शन प्रोसेस, वापरलेल्या कारची विक्री तसेच वस्तूंचे मार्केटिंग करत असल्याचे भासवून सहा महिन्यांपूर्वी महापे एमआयडीसीत बोगस कॉल सेंटर सर्व्हर स्थापन केले होते. त्यासाठी या टोळीने व्होडाफोनकडून १५०० लाईन्स घेतल्या होत्या. त्यानंतर या टोळीने बेकायदा परदेशातील कॉल्स भारतीय मोबाईल अथवा फोन क्रमांकावर वळवून फसवणूक करण्यास सुरुवात केली.
त्यामुळे परदेशातून भारतातील नातेवाईकांकडे येणारे कॉल हे इंटरनॅशनल कॉल न दिसता ते भारतातीलच नंबर असल्याचे दिसून येत होते. काही व्यक्तींना हा फसवणुकीचा प्रकार वाटल्याने केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, कार्नाटक, दिल्ली, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांतील अनेक नागरिकांनी डीओटीच्या टोल फ्री क्रमांकावर या कॉलबाबतच्या तक्रारी केली होत्या.
...
धमकीसाठी वापर
उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथील गोरखनाथ पोलिस ठाण्यात दाखल असलेला धमकीचा गुन्हा या बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून केला गेला असण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे या आरोपींनी अशाच प्रकारे हैद्राबाद येथील डाटा सेंटरमध्ये बोगस कॉल सेंटर सर्व्हर स्थापित केले असून याबाबत डीओटी व हैद्राबाद पोलिसांना माहिती देण्यात आल्याचे गुन्हे शाखेचे पोलिस उपयुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले.
...