घरफोडी करणारे सराईत आरोपी अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरफोडी करणारे सराईत आरोपी अटकेत
घरफोडी करणारे सराईत आरोपी अटकेत

घरफोडी करणारे सराईत आरोपी अटकेत

sakal_logo
By

नालासोपारा, ता. २५ (बातमीदार) : वसई-विरार-नालासोपाऱ्यासह मुंबई परिसरात घरफोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या चार सराईत आरोपींना अटक करण्यात वालीव गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे. या आरोपींकडून ४ लाख ६३ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून एकट्या वालीव पोलिस ठाणे हद्दीतील १२ आणि निर्मलनगर पोलिस ठाण्यातील एक अशा १३ गुन्ह्यांची कबुली या चोरट्यांनी दिली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास बर्वे यांनी दिली.
शमीम ऊर्फ राजा रमजान अन्सारी, बालकराम ऊर्फ मुन्ना रामकिशन विश्वकर्मा, वलीउल्ला शफीउल्ला चौधरी, चँद ऊर्फ हमीद शफीक अहमद रईम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून हे सर्व जण वसई परिसरातील राहणारे आहेत. दिवसा रेखी आणि रात्री घरफोडी करणारे हे सराईत आरोपी असून या आरोपींनी वालीव, निर्मळनगर मुंबई, ठाणे परिसरात घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले आहे. वालीव गुन्हे प्रकटीकरण पथकाचे ज्ञानेश फडतरे आणि त्यांच्या टीमने वेगवेगळ्या भागातून या आरोपीना अटक केली. आरोपींकडून चोरीस गेलेल्या मोटारसायकल, रोख रक्कम, कंपनीतील लोखंडी व स्टील पार्ट असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.