रिक्षात विसरलेले मंगळसूत्र तक्रारदाराच्या स्वाधीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिक्षात विसरलेले मंगळसूत्र तक्रारदाराच्या स्वाधीन
रिक्षात विसरलेले मंगळसूत्र तक्रारदाराच्या स्वाधीन

रिक्षात विसरलेले मंगळसूत्र तक्रारदाराच्या स्वाधीन

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. २५ (बातमीदार) ः रिक्षात विसरलेले नऊ तोळे वजनाचे साडेचार लाखांचे सोन्याचे दागिने तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या २४ तासांत तक्रारदाराच्या स्वाधीन करण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे. घाटकोपर येथे राहणाऱ्या आस्था निकम यांच्या घरी दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे त्यांनी आईचे सोन्याचे गंठण अंबरनाथ येथे राहणारे त्यांचे मामा संदीप मोरे यांच्याकडे ठेवले होते. सोमवारी (ता. २४) लक्ष्मीपूजन असल्याने आस्था गंठण घेऊन घाटकोपरला जाण्यासाठी अंबरनाथला रिक्षाने जात असताना दागिने असलेली पर्स घाईत रिक्षात विसरल्या. शिवाजीनगर पोलिसांनी हे सोन्याचे गंठण शोधून आज २५ ऑक्टोबरला आस्था निकम यांच्या स्वाधीन केले.