विकास कार्यातून चांदीवलीचा चेहरामोहरा बदलणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विकास कार्यातून चांदीवलीचा चेहरामोहरा बदलणार
विकास कार्यातून चांदीवलीचा चेहरामोहरा बदलणार

विकास कार्यातून चांदीवलीचा चेहरामोहरा बदलणार

sakal_logo
By

घाटकोपर, ता. २७ (बातमीदार) ः चांदिवलीचा विकास करणे हा एकच ध्यास घेऊन विधानसभेच्या निवडणुकीत तीन वर्षांपूर्वी उभा होतो. लोकांनी मला विश्वास दाखवून निवडून दिले, तो विश्‍वास सार्थ ठरविण्याचे कार्य माझ्या कामाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न मी करीत आहे, असे सांगत विकासकार्यातून चांदिवलीचा चेहरामोहरा बदलणार असल्‍याचे प्रतिपादन आमदार दिलीप लांडे यांनी केले आहे. लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त बाल विकास मंडळाच्या माध्यमातून कुर्ला काजूपाडा येथील सेन्टज्युड स्कूलच्या मैदानात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्‍यांनी नागरिकांशी संवाद साधला.
लांडे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणत्या मंत्रिपदापेक्षा माझ्या चांदिवलीचा विकास करणे याला मी प्राधान्य दिले आहे. मी दिलेल्या शब्दांपैकी चार कामांची सुरुवात झाली आहे. संघर्ष नगरमध्ये २५० बेडचे भव्य रुग्णालय आणि क्रीडा संकुल कामाची सुरुवात लवकरच होणार असल्‍याचे त्‍यांनी या वेळी स्‍पष्‍ट केले. आपल्या कार्यकाळात साकीनाका ते कमानीचा रस्ता रुंद करण्याचे काम सुरू झाले असून नाहरमध्ये रस्त्याचे काम केले जात आहे. मिठी नदीलगतचे क्रांतिनगर आणि संदेशनगरच्या झोपडीधारकांचे पुनर्वसन रखडले होते. त्यापैकी ६५० कुटुंबीयांना लवकरच चावी देण्याचे कार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्‍याचेही त्‍यांनी या वेळी नमुद केले. तसेच रेशनिंग कार्यालय चांदिवलीत करण्यासाठी जागेची निवड झाली आहे, अशा अनेक कामांचा लेखाजोखा दिलीप लांडे यांनी जनतेसमोर मांडला.