तृतीयपंथांच्या दोन गटात हाणामारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तृतीयपंथांच्या दोन गटात हाणामारी
तृतीयपंथांच्या दोन गटात हाणामारी

तृतीयपंथांच्या दोन गटात हाणामारी

sakal_logo
By

खारघर, ता. २७ (बातमीदार) : भाऊबीजेच्या दिवशी घरोघरी भेट मागण्यासाठी फिरणाऱ्या बोगस तृतीयपंथींना मारहाणीचा प्रकार खारघरमध्ये घडला. सणासुदीच्या दिवशीच हा प्रकार झाल्याने या वेळी परिसरातील बघ्यांची गर्दी झाली होती. खारघर, सेक्टर बारामधील बैठ्या चाळीत एक व्यक्ती साडी नेसून तृतीयपंथी असल्याचे सांगून भाऊबीजेची मागणी करीत होती. हा प्रकार तृतीयपंथींच्या दुसऱ्या एका गटाला समजला होता. याबाबतची विचारणा केल्यावर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तिघा तृतीयपंथींच्या गटाने बोगस तृतीयपंथी बनलेल्या व्यक्तीला बेदम मारहाण केली होती. हा वाद पाहण्यासाठी गर्दी झाली होती. हे भांडण काही केल्या थांबत नसल्याचे अखेर खारघर भाजपचे सरचिटणीस दीपक शिंदे यांनी खारघर पोलिस ठाण्याशी संपर्क साधून या तृतीयपंथींना पोलिसांच्या ताब्यात दिले.