गोठीवलीत भंगाराच्या दुकानाला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोठीवलीत भंगाराच्या दुकानाला आग
गोठीवलीत भंगाराच्या दुकानाला आग

गोठीवलीत भंगाराच्या दुकानाला आग

sakal_logo
By

घणसोली, ता. २७ (बातमीदार) ः गोठवलीतील एका भंगार गोदामाला गुरुवारी (ता.२७) आग लागली होती. या आगीवर ऐरोली अग्निशमन दलाने तत्काळ नियंत्रण मिळवण्यात आले.
गोठवली सेक्टर २३, माऊली हाईट्सच्या गेट मागे एक भंगाराचे दुकान आहे. या दुकानाला सकाळी ९ च्या सुमारास आग लागली होती. याबाबतची माहिती तत्काळ ऐरोली अग्निशमन दलाला देण्यात आली होती. ऐरोलीचे केंद्र अधिकारी गजेंद्र सुसविरक यांनी घटनास्थळी पाहणी करून तत्काळ आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. या आगीमध्ये दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या डेकोरेशनचे सामान जळून गेले आहे.