कलाकारांनी रेखाटली उपमुख्यमंत्र्यांची रांगोळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कलाकारांनी रेखाटली उपमुख्यमंत्र्यांची रांगोळी
कलाकारांनी रेखाटली उपमुख्यमंत्र्यांची रांगोळी

कलाकारांनी रेखाटली उपमुख्यमंत्र्यांची रांगोळी

sakal_logo
By

विरार, ता. २७ (बातमीदार) ः रांगोळी कलेसाठी प्रसिद्ध असलेल्या जूचंद्र गावातील कलाकारांची कला सातासमुद्रापार गेली आहे. यातच या दिवाळीत रांगोळी कलाकार शैलेश पाटील, पंकज पाटील व करण वटार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दारी काढलेली रांगोळी लक्षवेधी ठरली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी काही काळ रांगोळीतील आपली प्रतिमा बघून स्तब्ध झाले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी जूचंद्रच्या रांगोळी कलाकारांच्या कलेचे कौतुक केले.