पामबीच रोडवर डेब्रिज, फटाक्यांचा कचरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पामबीच रोडवर डेब्रिज, फटाक्यांचा कचरा
पामबीच रोडवर डेब्रिज, फटाक्यांचा कचरा

पामबीच रोडवर डेब्रिज, फटाक्यांचा कचरा

sakal_logo
By

घणसोली, ता. २७ (बातमीदार)ः येथील पामबीच रोडवर गेल्या काही दिवसांपासून डेब्रिज टाकण्यात आले आहे. अशातच दिवाळीत फोडलेल्या फटाक्यांचा कचरा साचला आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात लाकडी कचरा देखील घणसोली पामबीच रोडवर पडलेला आहे. यामुळे नवी मुंबई शहराच्या स्वच्छतेला बाधा पोहचत असून नागरिकांना देखील अडचणींचा सामना करावा लागत आहे.
घणसोली पामबीच रोडला घणसोली विभागाची ओळख समजले जाते. हा परिसर स्वच्छ असल्याने नागरिकांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिलेले आहे. मात्र, या परिसरात गेल्या काही दिवसांपासून रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकण्यात आले आहे. अशातच शहरातील फटाक्यांचा तसेच लाकडी कचरा याठिकाणी मोठ्या प्रमाणात साचला आहे. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणात देशात पहिल्या क्रमांक मिळवण्याच्या नवी मुंबई पालिकेच्या प्रयत्नांनाच खीळ बसली आहे.
-----------------------------------------
परिसरातील नागरिकांना त्रास
महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दिवाळी सणाच्या कालावधीत शहर स्वच्छतेवर अधिक काटेकोर लक्ष देण्यात आले होते. मात्र, तरीही अनेक ठिकाणी शहरात कचरा पाहायला मिळत आहे. घणसोली पामबीच रोडवर असलेल्या कचऱ्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
----------------------------------------
दिवाळीच्या काळात काही ठिकाणी डेब्रिज टाकण्याचे प्रकार झाले आहेत. घणसोली पामबीच रोडवरील डेब्रिज आणि फटाक्यांचा कचरा लवकरच उचलण्यात येईल.
- संजय पाटील, घनकचरा व्यवस्थापन, पालिका