नाका कामगारांना दिवाळी फराळवाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाका कामगारांना दिवाळी फराळवाटप
नाका कामगारांना दिवाळी फराळवाटप

नाका कामगारांना दिवाळी फराळवाटप

sakal_logo
By

कल्याण, ता. २७ (बातमीदार) : कल्याण पश्चिममधील सामाजिक संघटना रोटरी क्लब, स्वामी नारायण मंदिर, पोलिस विभाग यांच्या वतीने शेकडो नाका कामगारांना दिवाळी फराळ वाटप करून दिवाळी साजरी करण्यात आली. पोलिस विभागात काम करणारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुखदेव पाटील यांच्या संकल्पनेमधून कल्याणमधील सामाजिक संस्था विविध कार्यक्रम राबवित असतात. कोरोना काळात लॉकडाऊन सुरू होताच रेल्वे आणि अन्य वाहतूक सेवा बंद झाल्याने अनेकांचे हाल झाले. अशावेळी गरजूंना अन्नवाटप करण्यात आले होते. यावर्षी कल्याणच्या शिवाजी चौकात उभे असणाऱ्या नाका कामगारांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. शेकडो नाका कामगारांना दिवाळी फराळ मोफत वाटप करत दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.