गडचिंचले येथे घराला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडचिंचले येथे घराला आग
गडचिंचले येथे घराला आग

गडचिंचले येथे घराला आग

sakal_logo
By

कासा, ता. २७ (बातमीदार) : डहाणू तालक्यातील गडचिंचले पाटीलपाडा येथे गुरुवारी सकाळी घराला आग लागून त्यात ठेवलेल्या भात पिकाचा साठा जळून खाक झाला आहे. बापजी आणि विलास बरफ या दोन भावंडांनी शेतीतील भातपीक कापून शेतावरील घरात ठेवले. ते भातपीक जळून खाक झाल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.