दिवाळीनिमित्ताने वारकऱ्यांना वस्त्र दान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळीनिमित्ताने वारकऱ्यांना वस्त्र दान
दिवाळीनिमित्ताने वारकऱ्यांना वस्त्र दान

दिवाळीनिमित्ताने वारकऱ्यांना वस्त्र दान

sakal_logo
By

मुलुंड, ता. २७ (बातमीदार) ः सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि शिक्षण तज्ज्ञ रमेश खानविलकर यांनी दिवाळी निमित्ताने जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर देहू येथील वारकऱ्यांना वस्त्रदान केले. आपण समाजाचे काही देणे लागतो ही बाब लक्षात ठेवून देहूमधील वारकऱ्यांची दिवाळी आनंदमय करण्यासाठी त्यांना लागणाऱ्या आवश्यक अशा नवीन पोशाखांचे वितरण खानविलकर यांनी या वेळी केले.