पश्चिम रेल्वे चा पालघर जिल्ह्यावर अन्याय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पश्चिम रेल्वे चा पालघर जिल्ह्यावर अन्याय
पश्चिम रेल्वे चा पालघर जिल्ह्यावर अन्याय

पश्चिम रेल्वे चा पालघर जिल्ह्यावर अन्याय

sakal_logo
By

पालघर, ता. २७ (बातमीदार) ः पश्चिम रेल्वे प्रशासनाने डहाणू ते वैतरणा प्रवाशांच्या अपेक्षांचा भंग केला आहे. प्रवासी संघटना, लोकप्रतिनिधी आणि प्रवाशांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवण्यात आल्याचे येत्या वेळापत्रकात दिसून आले आहे. लॉकडाऊनदरम्यान रद्द असलेली डहाणूवरून सुटणारी सकाळची ७.०५ ची लोकल पश्चिम रेल्वेच्या डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर यांनी पालघर भेटीदरम्यान आश्वासन देऊनही सुरू करण्यात आली नाही. लोकशक्तीचा सफाळे थांबा बंद केल्यानंतर त्याऐवजी लोकल सुरू करण्याची मागणीदेखील मान्य करण्यात आलेली नाही. पहाटेची डहाणूकडे जाणारी लोकल रद्द करून तीच गाडी रात्री ९.२० वाजता डहाणूकडे सुरू करण्यात आली आहे. तिचाही उल्लेख नवीन सेवा असा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात कोणतीही नवी सेवा डहाणू ते वैतरणा भागातील प्रवाशांना मिळालेली नाही.
नवीन सुरू होणाऱ्या गाड्या बोरिवलीवरून थेट वापी स्थानकात थांबत असल्याने मधल्या भागात राहणारे प्रवासी या सेवेपासून वंचित राहत आहेत. महाराष्ट्र संपर्क क्रांती असे नाव असलेली गाडी मुंबईहून सुटल्यानंतर बोरिवली या महाराष्ट्रातील एकाच स्थानकावर थांबते. ही रेल्वे पुढील सर्व स्थानकांना वाकुल्या दाखवत निघून जाते.