आदिवासी बांधवांसोबत दिवाळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदिवासी बांधवांसोबत दिवाळी
आदिवासी बांधवांसोबत दिवाळी

आदिवासी बांधवांसोबत दिवाळी

sakal_logo
By

कांदिवली, ता. २७ (बातमीदार) ः महाराष्ट्रीय रेड्डी विवेक मित्र मंडळाने आदिवासी बांधवासोबत दिवाळी साजरी केली. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील सखाराम पाडा, पटकीचा पाडा व वाशाळा (खुर्द) येथे दिवाळीचा फराळ, कपडे व शालेय साहित्य वाटप करून त्‍यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली. आदिवासी पाड्यातील प्रत्येक महिलेला साडी, मुला-मुलींना कपडे, स्कूल बॅग, वह्या आणि ड्रॉईंग साहित्यवाटप करण्यात आले. महाराष्ट्रीय रेड्डी विवेक मित्र मंडळाचे अध्यक्ष शिवजी कैले यांच्‍यासह डी. डी. मलवाड, संजय चामे, उमेश कासले, चंद्रकांत मरलापल्ले आदींनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले.