कांदिवलीत रंगली ‘दिवाळी पहाट’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांदिवलीत रंगली ‘दिवाळी पहाट’
कांदिवलीत रंगली ‘दिवाळी पहाट’

कांदिवलीत रंगली ‘दिवाळी पहाट’

sakal_logo
By

कांदिवली, ता. २७ (बातमीदार) ः आमदार योगेश सागर यांनी चारकोप मार्केट येथे दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित केला होता. २६ ऑक्टोबर रोजी पहाटे भूपाळी व भैरवी रागातील गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. चारकोपची गानकोकिळा गौरी गोसावीचे आमदार योगेश सागर यांनी कौतुक करून सत्कार केला. या वेळी ओव्या, अभंग, लोकगीते, निसर्गगीते, संतवाणी गायली गेली. तसेच वसंत देसाई, श्रीनिवास खळे, गदिमा, शांता शेळके, जगदीश खेबुडकर यांसारख्या मातब्बरांच्या रचना गायक अर्चना गोरे, मंदार आपटे, मधुरा देशपांडे, जयदीप बागवाडकर यांच्यासह चारकोपची कन्या गौरी गोसावी यांनी सादर केल्‍या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. समीरा गुजर जोशी यांनी केले. या कार्यक्रमास खासदार गोपाळ शेट्टी, जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, आमदार योगेश सागर, मंडळ अध्यक्ष दीपक (बाळा) तावडे, वॉर्ड अध्यक्ष प्रमोद गुजर यांच्यासह सर्व नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.