विक्रेत्याला किरकोळ कारणावरून मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रेत्याला किरकोळ कारणावरून मारहाण
विक्रेत्याला किरकोळ कारणावरून मारहाण

विक्रेत्याला किरकोळ कारणावरून मारहाण

sakal_logo
By

मानखुर्द, ता. २७ (बातमीदार) ः गोवंडीच्या शिवाजी नगरमधील रोड क्रमांक आठवर किरकोळ कारणावरून वाहिद शेख याला बुधवारी (ता. २६) मारहाण करण्यात आली. वाहिद हे कापडाच्या चिंध्या विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला. तिघांपैकी मोईनुद्दीन खान याला अटक केली असून दोघांचा शोध शिवाजी नगर पोलिस घेत आहेत.
शिवाजी नगर संजय नगर पार्ट दोन परिसरात राहणारे वाहिद हे चिंध्या विक्रीचा व्यवसाय करतात. रोड क्रमांक आठच्या कडेला कपड्यांचे, तसेच चिंधीचे ढीग ठेवतात. आरोपींना त्याचा राग होता. त्या रागातून बुधवारी सकाळी सातच्या सुमारास त्यांनी वाहिदशी वाद घालत मारहाण केली. बांबूच्या साह्याने केलेल्या मारहाणीमुळे वाहिद यांच्या हात, तसेच पायाला दुखापत झाली आहे.