भिवंडीत भंगार गोदामाना वाढत्या आगीच्या घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत भंगार गोदामाना वाढत्या आगीच्या घटना
भिवंडीत भंगार गोदामाना वाढत्या आगीच्या घटना

भिवंडीत भंगार गोदामाना वाढत्या आगीच्या घटना

sakal_logo
By

भिवंडी, ता. २७ (बातमीदार) : भिवंडी शहर आणि परिसरात सुमारे पाचशेपेक्षा जास्त भंगाराची दुकाने व भंगाराची गोदामे आहेत. लोकवस्तीत असलेली ही बरीचशी दुकाने व गोदामे अनधिकृत असून यांना वारंवार लागणाऱ्या आगीने परिसरातील नागरी वस्तीला धोका निर्माण झाला आहे. ऐनदिवाळी सणात शहर तसेच ग्रामीण भागात आगीच्या चार घटना घडल्या असून त्यापैकी दोन घटना भंगार गोदामांना आग लागून घडल्या. शहरातील कणेरी परिसरात असलेल्या एका भंगार गोदामाबरोबरच शेलार ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या एका भंगार गोदामाला आग लागली होती. भंगार व्यवसाय करताना अनेकांकडे परवाना नसतो, त्यामुळे दुकानात अथवा गोदामात आग प्रतिबंधक साधने ठेवलेली नसतात. अशा गोदामांना व दुकानांना वारंवार आग लागण्याच्या घटना शहर आणि परिसरात घडत असतात. त्यामुळे परिसरातील नागरी वस्तीला धोका निर्माण झाला असून या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन भिवंडी ग्रामीण भागातील भंगार दुकाने व गोदामांवर आणि महापालिकेच्या आयुक्तांनी शहरातील भंगार दुकाने आणि गोदामांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.