रिक्षाचालकाला हप्त्यासाठी जीवे मारण्याची धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिक्षाचालकाला हप्त्यासाठी जीवे मारण्याची धमकी
रिक्षाचालकाला हप्त्यासाठी जीवे मारण्याची धमकी

रिक्षाचालकाला हप्त्यासाठी जीवे मारण्याची धमकी

sakal_logo
By

नालासोपारा, ता. २७ (बातमीदार) : नालासोपाऱ्यात रिक्षा माफियांची दादागिरी दिवसागणिक वाढत चालली आहे. रिक्षा थांब्यावर रिक्षा लावायची असेल तर दरमहिना दोन हजार रुपये द्यावे लागतील, दिले नाही तर ठार मारले जाईल, अशी धमकीच एका रिक्षा माफियाने रिक्षाचालकाला दिली असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. याबाबत आचोळा पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या रिक्षा माफियांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी रिक्षाचालक करत आहेत.
भावेश चौहान ऊर्फ लालू, प्रभाकर सिंग चौहान, अभिषेक चौहान ऊर्फ मुलायम असे गुन्हा दाखल झालेल्या रिक्षा माफियांची नावे आहेत. हे तिघेही नालासोपारा पूर्व कॅपिटल मॉलजवळील परिसरात राहणारे आहेत. राहुल राय असे तक्रारदार रिक्षाचालकाचे नाव आहे. नालासोपारा पूर्व अलकापुरी या भागात तक्रारदार हा मागील आठ वर्षांपासून रिक्षा चालवतो. याच अलकापुरी परिसरात आरोपी भावेश ऊर्फ लालू याच्या १५ ते २० रिक्षा आहेत. अलकापुरी परिसरात या रिक्षा माफियांची दादागिरी चालत असून, अलकापुरी रिक्षा थांब्यावर जर रिक्षा थांबवून धंदा करायचा असेल तर दिवसाला ५० रुपये आणि महिन्याला दोन हजार रुपये प्रत्येक रिक्षाचालकाकडून जबरदस्तीने वसुली करतो. जर रिक्षाचा हप्ता नाही दिला तर सर्वसामान्य रिक्षाचालकांना धमकावणे, ठार मारण्याच्या धमक्या देतो, असा आरोप तक्रारदार रिक्षाचालकाने केला आहे. याबाबत आचोळा पोलिस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३८६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.