ज्येष्ठ दिग्दर्शक इस्माईल श्रॉफ यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठ दिग्दर्शक इस्माईल श्रॉफ यांचे निधन
ज्येष्ठ दिग्दर्शक इस्माईल श्रॉफ यांचे निधन

ज्येष्ठ दिग्दर्शक इस्माईल श्रॉफ यांचे निधन

sakal_logo
By

मुंबई, ता. २७ : ‘आहिस्ता आहिस्ता’, ‘बुलंदी’, ‘थोडी सी बेवफाई’ या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शक इस्माईल श्रॉफ (वय ६२) यांचे बुधवारी (ता. २६) दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
श्रॉफ यांना काही महिन्यांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे त्यांच्या शरीराची उजवी बाजू पूर्णपणे निकामी झाली होती. त्यांच्यावर अंधेरीतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारांदरम्यान बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
इस्माईल श्रॉफ यांचे खरे नाव एस. व्ही. इस्माईल होते; पण बॉलीवूडमध्ये ते इस्माईल श्रॉफ म्हणूनच ओळखले जात. त्यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण १५ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यात ‘आहिस्ता आहिस्ता’, ‘बुलंदी’, ‘लव्ह ८६’, ‘थोडीसी बेवफाई’, ‘सुरिया’, आदी सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. त्यांनी राजेश खन्ना, धर्मेंद्र, राज कुमार, गोविंदा, शबाना आझमी आणि पद्मिनी कोल्हापुरे या कलाकारांसोबत काम केले आहे. दिवंगत अभिनेते राजकुमार यांच्यासोबत चार चित्रपट करणारे ते एकमेव दिग्दर्शक होते. त्यांच्या अशा आकस्मितपणे जाण्याने बॉलीवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.