कोकण कट्टाची आदिवासी भगिनींना भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकण कट्टाची आदिवासी भगिनींना भेट
कोकण कट्टाची आदिवासी भगिनींना भेट

कोकण कट्टाची आदिवासी भगिनींना भेट

sakal_logo
By

जोगेश्वरी, ता. २७ (बातमीदार) ः समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या विलेपार्ले येथील कोकण कट्टा या सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी दिवाळीमध्ये पालघर येथील मोखाडा आदिवासी पाड्यातील महिलांसोबत भाऊबीज साजरी होत असते. या वर्षी कोकण कट्टाच्या सभासदांनी पेण तालुक्यातील आदिवासी पाड्यांची निवड केली. यामध्ये निगडावाडी, प्रधानवाडी, दर्गावाडी आणि भेंडीचीवाडी या वाड्यांचा समावेश आहे. येथील ३४८ आदिवासी महिलांना भाऊबीज भेट म्हणून साडी-चोळी आणि फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच तेथील लहान मुलांना खाऊचे वाटपही करण्यात आले. या कार्यात पेण येथील ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचाही समावेश होता. या वेळी कट्टाचे संस्थापक अध्यक्ष अजित पितळे, ग्रामसंवर्धन संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर, कोकण कट्टाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दादा गावडे, खजिनदार सुजित कदम, दया मांडवकर आदी मान्‍यवर उपस्थित होते, अशी माहिती शिवाजी खैरनार यांनी दिली.