वाढवणच्या उपसरपंचपदी हरेश्वर पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाढवणच्या उपसरपंचपदी हरेश्वर पाटील
वाढवणच्या उपसरपंचपदी हरेश्वर पाटील

वाढवणच्या उपसरपंचपदी हरेश्वर पाटील

sakal_logo
By

डहाणू, ता. २७ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील वाढवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी महाविकास आघाडीचे हरेश्वर पाटील यांची आज बहुमताने निवड झाली; तर सरपंच पदाच्या थेट निवडणुकीत पूजा पाटील यांची आधीच निवड झाली होती. प्रस्तावित वाढवण बंदरामुळे काही बंदरसमर्थक राजकीय पक्षांनी वाढवण ग्रामपंचायतीवर आपल्या पक्षाचे वर्चस्व राहावे म्हणून काही बंदर समर्थक उमेदवारांना हाताशी धरून त्यांना आर्थिक साह्य केल्याचा बोलबाला होता. त्याला मतदारांनी न जुमानता काही दुष्ट प्रवृत्तीच्या उमेदवारांचा पराभव केला होता.