ब्रह्माकुमारी मुलुंड सब झोनतर्फे दीपोत्‍सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रह्माकुमारी मुलुंड सब झोनतर्फे दीपोत्‍सव
ब्रह्माकुमारी मुलुंड सब झोनतर्फे दीपोत्‍सव

ब्रह्माकुमारी मुलुंड सब झोनतर्फे दीपोत्‍सव

sakal_logo
By

मुलुंड, ता. २७ (बातमीदार) ः ब्रह्माकुमारी मुलुंड झोन यांच्या संयुक्त विद्यमाने ५० व्या वर्धापनदिनानिमित्त २४ ऑक्टोबर रोजी दयानंद स्कूल ग्राऊंड येथे दिवाळी जल्लोषात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन ब्रह्माकुमारी हर्षा यांनी केले होते. या प्रसंगी १०८ पणत्यांची आरास करण्यात आली होती. दिवाळीच्या निमित्ताने, तसेच ब्रह्माकुमारी मुलुंड सब झोनच्या वर्धापनदिना निमित्ताने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुलुंड सब झोनच्या मुख्य प्रशासक राजयोगिनी डॉ. ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी यांनी यावेळी आपले विचार मांडले आणि उपस्थितांना संबोधित करून सर्वांना दिवाळी आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ. मोनिषा रावत यांनी हीलिंग थेरपीद्वारे आणि औषधांशिवाय उपचार या विषयावर सत्र आयोजित केले होते. त्‍यानंतर सांस्कृतिक नृत्य आदी कार्यक्रम सादर करण्यात आले.