शिरोळे ग्रामपंचायतीवर मनसेची एकहाती सत्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरोळे ग्रामपंचायतीवर मनसेची एकहाती सत्ता
शिरोळे ग्रामपंचायतीवर मनसेची एकहाती सत्ता

शिरोळे ग्रामपंचायतीवर मनसेची एकहाती सत्ता

sakal_logo
By

भिवंडी, ता. २७ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिरोळे ग्रामपंचायतीवर मनसेने एकहाती सत्ता प्रस्थापित केली. थेट सरपंच निवडीत विजय मिळवल्यानंतर उपसरपंच निवडणुकीत मनसेच्या रविना मानकर यांनी शिवसेना उमेदवाराचा ६ विरुद्ध ३ मताने पराभव करीत विजय मिळवला आहे. तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत दोन ग्रामपंचायतींवर मनसेने विजय संपादन केला होता. त्यामध्ये तालुक्यातील शिरोळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी लक्ष्मी लाथड या थेट निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. त्यानंतर गुरुवारी पार पडलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत मनसेतर्फे रविना मानकर तर शिवसेनेकडून जयदास मते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक घेण्यात आली. ज्यामध्ये रविना मानकर या विजयी झाल्या. मनसेने ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन केल्याने इतर ग्रामपंचायतींपेक्षा या गावाचा विकास अधिक होईल व नागरिकांच्या विश्वासास सरपंच उपसरपंच यांसह ग्रामपंचायती सदस्य पात्र ठरतील, असा विश्वास मनसे विद्यार्थी ठाणे जिल्हा अध्यक्ष परेश चौधरी यांनी व्यक्त केला आहे. सरपंच व उपसरपंच यांना शुभेच्छा देण्यासाठी मनसे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डी. के. मात्रे, भिवंडी लोकसभा अध्यक्ष शैलेश बिडवी, विद्यार्थी सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संतोष साळवी, मदन पाटील, संजय पाटील यांच्यासह अनेक मनसे कार्यकर्ते पदाधिकारी व शिरोळे ग्रामस्थ उपस्थित होते.