वंचित आघाडीचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत शिवबंधनात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वंचित आघाडीचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत शिवबंधनात
वंचित आघाडीचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत शिवबंधनात

वंचित आघाडीचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत शिवबंधनात

sakal_logo
By

भिवंडी, ता. २७ (बातमीदार) : वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सुनील भगत यांनी बाळासाहेब आंबेडकर यांची साथ सोडून नुकताच भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख रूपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून सुनील भगत यांनी हाती शिवबंधन बांधून प्रवेश केला आहे. ज्यामुळे भिवंडी लोकसभा क्षेत्रात ठाकरे गटाची ताकद वाढवण्यास मदत होणार आहे. या पक्ष प्रवेशप्रसंगी सुनील भगत यांच्या सोबत जिल्हा उपाध्यक्ष संतोष कोरके, कौशल वर्मा, दिलीप नगरकर यांनीदेखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे. राज्यात सुरू असलेल्या राजकीय चिखलफेकीत उद्धव ठाकरे यांचे संयमी व अभ्यासू नेतृत्व राज्याला अत्यावश्यक असल्याने त्यांच्या नेतृत्वावर आम्ही विश्वास व्यक्त करीत असून त्यांचे हात बळकट करण्याकरिता आम्ही शिवसेना पक्षात प्रवेश करीत असल्याची प्रतिक्रिया सुनील भगत यांनी दिली आहे.