मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीच्या अपघातात ३ ठार २ जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई-नाशिक महामार्गावर  दुचाकीच्या अपघातात ३ ठार २ जखमी
मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीच्या अपघातात ३ ठार २ जखमी

मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीच्या अपघातात ३ ठार २ जखमी

sakal_logo
By

खर्डी, ता. २७ (बातमीदार) : मुंबई-नाशिक महामार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी संध्याकाळी ५ च्या दरम्यान घडली आहे. मृतांमध्ये एका ८ वर्षीय मुलाचा समावेश आहे. शहापूर तालुक्यातील मुंबई-नाशिक महामार्गावर उंबरमाळी येथे अमन हॉटेलजवळ दोन दुचाकीस्वारांचा समोरासमोर अपघात होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाला. जयराम सोमनाथ भांबळे (वय ८) रा. उबरमळी. बबन साबळे, व समृद्धी महामार्गातील मजूर मस्तान हे जागीच ठार झाले आहे; तर दत्ता हिले व नीलकंठ भुते हे दोन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर खर्डी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.